TRENDING:

Bandu Andekar : 'नेकी का काम, आंदेकर का नाम' घोषणेचं काय झालं? बंडू आंदेकरच्या घरातला निवडणूक निकाल आला!

Last Updated:

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये गुंडांना तिकीट देण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पुण्याच्या या निवडणुकीत आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याचा दारूण पराभव झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये गुंडांना तिकीट देण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पुण्याच्या या निवडणुकीत आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्या कुटुंबातल्या दोन महिलांचा विजय झाला आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याच्या घरातील दोन व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. प्रभाग क्रमांक 23 मधून बंडू आंदेकरची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि बंडू आंदेकरची सून सोनाली आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या, या दोघींची आता पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून एन्ट्री होणार आहे. सोनाली आंदेकर यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे.
'नेकी का काम, आंदेकर का नाम' घोषणेचं काय झालं? बंडू आंदेकरच्या घरातला निवडणूक निकाल आला!
'नेकी का काम, आंदेकर का नाम' घोषणेचं काय झालं? बंडू आंदेकरच्या घरातला निवडणूक निकाल आला!
advertisement

आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकर सध्या तुरुंगात आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती, ज्यावरून बराच वाद निर्माण झाला होता.

पुण्यामध्ये भाजप विजयी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

पुणे महापालिकेमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आली आहे. पुण्यात भाजपने 165 पैकी 123 जागांवर विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचा 21, काँग्रेस 16, राष्ट्रवादी शरद पवार 3, शिवसेना उबाठा 1 आणि शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/पुणे/
Bandu Andekar : 'नेकी का काम, आंदेकर का नाम' घोषणेचं काय झालं? बंडू आंदेकरच्या घरातला निवडणूक निकाल आला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल