पुणे : तुळशीचे लग्न होताच सर्वत्र लग्नाची धामधून सुरु झालेली आहे. त्यात लग्न म्हटलं की प्री- वेडिंग आलचं. आतापर्यंत जगभरात अनोख्या पद्दतीने प्री-वेडिंग करण्यात आले आहेत. पण सध्या सर्वत्र होतेय ती पुण्यातील एक जोडप्याच्या प्री-वेडिंगची चर्चा कारण हे करण त्या दोघांना अतिशय महागात पडलं आहे. नेमकं काय झाल ते जाणून घ्या.
advertisement
लग्नापूर्वी जोडप्यावर कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हे जोडप आहे . येत्या काही दिवसांत त्याचे लग्न पार पडणार आहे, त्यामुळे त्यांना हटके पद्धतीने प्री-वेडिंग करायची होती. या सर्वा कारणांमुळे त्यांनी काहीतरी हटके करण्यासाठी चक्क पुणे मेट्रो स्थानकाची निवड केली आणि याचाच फटका त्यांना पडला. कारण त्यांनी पुणे शहरातील मेट्रोमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट करताना चक्क कायदे मोडले आणि यामुळे त्यांना गंभीर कारवाईला सामोरे जावे लागले.
पुण्यातील या जोडप्याने शहरातील विविध मेट्रो स्टेशन तसेच मेट्रो ट्रेनमध्ये फोटोशूट केलं पण त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती. मेट्रो प्रशासनासमोर हा प्रकार समोर आल्यानंतर त्वरित कारवाई सुरू करण्यात आली. फोटोशूट दरम्यान अनेक प्रवाशांचे हाल झाले. स्टेशनवर गर्दी, ट्रॅफिक व्यवस्थापन आणि सुरक्षा यावरही याचा गंभीर परिणाम झाला. फोटोग्राफरने ट्रेनमध्ये आणि स्टेशनच्या प्लेटफॉर्मवर मोकळेपणाने शूटिंग केले, ज्यामुळे इतर प्रवाशांना प्रवास करताना गैरसोय झाली.
मेट्रो प्रशासनाने त्वरित कारवाई करत, जोडप्यासह फोटोग्राफरवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्या गैरवर्तनामुळे मेट्रोच्या सुरक्षेवर आणि सार्वजनिक सुविधेवर गंभीर परिणाम होऊ शकला असता. प्रशासनाने सांगितले की, मेट्रोमध्ये कोणत्याही प्रकारच्या शूटसाठी आधी अधिकृत परवानगी घेणे अनिवार्य आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते.
