पुण्यात भाजपाला 39 जागांची आघाडी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस केवळ 5 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र पहायला मिळतंय. अशातच गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे या पिछाडीवर असल्याचं कळतंय. प्रभाग क्रमांक 10 (ब) मध्ये जयश्री मारणे विरुद्ध सचिन पवार अशी लढत पहायला मिळाली. या प्रभागात शिवसेनेच्या मिनल धनवटे यांनी देखील तगडी फाईट दिली.
advertisement
दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षांनंतर शहरवासीयांना आपला कौल देण्याची संधी मिळाली आहे. शहरातील ४१ प्रभागांमधून एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. या निवडणुकीत चौरंगी सामना रंगला होता. महायुतीतील तीन पक्ष वेगळे लढत असल्याने स्पर्धा तीव्र झाली.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 11:30 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुण्यात वसंत मोरेंना 'झटका', भाजप तात्यांना दाखवणार कात्रजचा घाट? धक्कादायक कल समोर! गजा मारणेच्या पत्नीला धक्का!
