पुणे : राज्यभर आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा गुलाल उधळला आहे पुणे जिल्ह्यातील देखील 14 नगरपरिषद आणि 3 ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त नगरपरिषदेवर झेंडा फडकवत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याचे "दादा"झाले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण 9 ठिकाणी नगराध्यक्ष पद जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुन्हा समोर आला. या निकालानंतर अजित पवारांचा वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला..
advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं मिश्कीलपणे बोलणं सर्वांनाच माहिती आहे, अजित पवार कधी काय बोलतील याचा नेम नसतो. अशातच आज अजित पवारांनी माध्यम प्रतिनिधींनीशी बोलताना अजित पवारांचा मिश्कील अंदाज दिसून आला.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांना दादा निकाल लागलेत असं विचारताच अजितददांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. दादा निकाल लागलेत अस पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवारांनी जिल्हा (पुणे) कुणाच्या मागे बघ असं मिश्किल उत्तर देत आपला स्वॅग दाखवला आहे. त्यानंकर उपस्थितांध्ये मोठा हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
- पत्रकार - दादा निकाल लागलेत -
- अजित पवार - जिल्हा (पुणे) कुणाच्या मागे बघ!
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आलेल्या उमेदवारांची यादी
1) लोणावळा - राजेंद्र सोनवणे
2) दौंड - दुर्गादेवी जगदाळे
3) शिरूर - ऐश्वर्या पाचरणे
4) इंदापूर - भरत शाह
5) जेजुरी - जयदीप बारभाई
6) भोर -रामचंद्र आवारे
7) बारामती - सचिन सातव
8) फुरसुंगी - संतोष सरोदे
9) वडगाव मावळ (नगरपंचायत) - आंबोली ढोरे
पुण्यात अजित पवारांचा जलवा कायम
एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहराची अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख होती. परंतु, त्यांच्या बालेकिल्ल्याला भाजपने 2017 मध्ये सुरुंग लावला. 15 वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भाजपने उलथवून टाकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष दिले. मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे , पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पुण्यामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली. अजित पवारांचे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. अजित दादांनी पुणे जिल्हावर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. निकालानंतर अजित दादांचा जलवा पुणे जिल्हात कायम असल्याचे दिसून आले आहे.
