TRENDING:

Pune Navle Bridge : पुणेकरांनो.. आजपासून चुकीला माफी नाही, कुप्रसिद्ध नवले ब्रिजवर 'या' गाड्यांवर होणार कारवाई!

Last Updated:

Pune Navle Bridge New rule : कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रीज ते नवले ब्रीजच्या शेवटपर्यंत कमाल वेगमर्यादा 40 किमी प्रतितास इतकी निश्चित करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Navle Bridge News : पुणे शहरातील सर्वाधिक अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या नवले ब्रीज (Navle Bridge) आणि कात्रज बाह्यवळण मार्गावर (Katraj Bypass) होणाऱ्या घटना रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाने (Traffic Police) आता एक नवीन आणि कठोर उपाययोजना केली आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता नवे नियम लागू केले आहेत.
Pune Navle Bridge New travel rule traffic police
Pune Navle Bridge New travel rule traffic police
advertisement

कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रीज

पुणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीतील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रीज दरम्यान वाहनांच्या वेगामुळे वारंवार अपघात होत असल्याने रस्त्यावरील वेग मर्यादित करणे आवश्यक होते. त्यामुळे पोलिस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे शहर यांनी मोटार वाहन कायदा कलम 115, 116 (1)(2)(बी), 116 (4) व 117 अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. यानुसार, वाहनांच्या वेगावर 40 किमी प्रतितास इतकी मर्यादा बंधनकारक केली आहे.

advertisement

कमाल वेगमर्यादा 40 किमी प्रतितास

या आदेशानुसार, कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रीज ते नवले ब्रीजच्या शेवटपर्यंत कमाल वेगमर्यादा 40 किमी प्रतितास इतकी निश्चित करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने (जसे की अग्निशमन, पोलिस, रुग्णवाहिका इत्यादी) यांना मात्र या नियमातून वगळण्यात आले आहे. हे नवीन आदेश आजपासून लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी या मार्गावर वेगमर्यादेबाबत निर्गमित केलेले सर्व जुने आदेश रद्द करण्यात आले आहेत.

advertisement

स्पीड गन प्रणालीद्वारे कारवाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांदा आणि सोयाबीनच्या भावात पुन्हा चढ-उतार, मक्याला किती मिळाला आज भाव?
सर्व पहा

वाहतूक विभागामार्फत वाहनचालकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या वाहनांचे स्पीडोमीटर नियमित तपासावेत आणि रस्त्यावरील बोर्डिंग व चिन्हांकडे विशेष लक्ष द्यावे. या अधिसूचनेचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही (CCTV) आणि स्पीड गन प्रणालीद्वारे नियमांनुसार कठोर कारवाई (Action) करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Navle Bridge : पुणेकरांनो.. आजपासून चुकीला माफी नाही, कुप्रसिद्ध नवले ब्रिजवर 'या' गाड्यांवर होणार कारवाई!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल