गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील (AHTC) पोलीस अंमलदार उदयकुमार बाळासाहेब भोसले यांनी याप्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांना या परिसरात काही महिला अशोभनीय हावभाव करून लोकांना आकर्षित करत असल्याची आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तन करत असलेल्या चार महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणे आणि लोकांना आकर्षित करणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. देहू रोड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
Pune News: मॅट्रिमोनिअल साइटवर शोधला नवरदेव; पुण्याच्या तरुणीसोबत घडला भयंकर प्रकार, पोलिसांत धाव
पुण्यातील तरुणीची फसवणूक
दुसऱ्या एका घटनेत मॅट्रिमोनिअल साईटवरून आयुष्यभराचा जोडीदार शोधणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. लग्नाचं खोटं आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी या तरुणीची तब्बल सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
