मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नसून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत साई मांजरे हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. आज दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलून तो खेळण्यासाठी शेताकडे गेला होता. त्यानंतर त्याच भागात त्याचा मृतदेह आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यावेळी मुलाच्या डोक्याला मार लागला आहे आणि त्याच्या अंगावर पॅन्ट नाही आहे. त्यामुळे ही हत्या आहे की हा घातपात झाला आहे? याचा उलगडा होत नाही आहे.
advertisement
या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रामक झाले असून मुलाचा मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असून जोपर्यंत घटनेचा पूर्ण उलगडा लागत नाही व तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याची ग्रामस्थांनी भूमिका घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तर वनविभागाची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
