फसवणुकीची पद्धत: आरोपी सोनाली गिरीगोसावी हिने सुरुवातीला सदाशिव पेठेतील 'सिनिअर एजन्सी'मधून रोखीने औषधे खरेदी करून मालक दिनेश कर्नावट यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, "जयेश जैन याला क्रेडिटवर (उधारीवर) माल द्या, त्याचे पैसे मी देईन," असे आश्वासन तिने दिले. या विश्वासावर १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत आरोपींनी ३ कोटी ५४ लाख ५५ हजार ३२९ रुपयांची औषधे नेली. मात्र, मालाचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली.
advertisement
गुन्ह्यांचा आकडा १८ कोटींच्या पार: या दोघांविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत चार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांमधील फसवणुकीची एकूण रक्कम १८ कोटी रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाने या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे, तरीही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जानराव या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. औषध बाजारपेठेत इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने वितरकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
