जुन्या वादाचे रक्तरंजित वळण
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण मंगळवारी रात्री रस्त्याने जात असताना आरोपींनी त्याला वाटेत अडवलं. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी त्याच्यावर तुटून पडले. हल्ल्याचे गांभीर्य इतके होते की, एका संशयिताने रस्त्यावरील सिमेंटची फरशी थेट फिर्यादीच्या कपाळावर आणि हातावर मारली. तर दुसऱ्याने लोखंडी रॉडने वार करत फिर्यादीचे हात-पाय फोडले.
advertisement
चौघांना पोलीस कोठडी
हल्ल्यात तरुण गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याप्रकरणी पोलिसांनी गणेश असणे (वय १९), शिलराजवी हातोले उर्फ मोन्या (२०), विशाल कांबळे (२१) आणि एका अल्पवयीन मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. भरवस्तीत आणि हॉस्पिटलजवळच हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण
केवळ शस्त्रांनीच नव्हे, तर इतर आरोपींनी पीडित तरुणाला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. आरोपींचा उद्देश जीव घेण्याचाच होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. भोसरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शहरातील टोळीयुद्ध किंवा गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत.
