नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुमीत रतन पटाईत (वय २१, रा. आंबी) याने १४ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास एका ऑनलाइन ॲपद्वारे रिक्षा बुक केली होती. मात्र, काही कारणास्तव त्याने हे बुकिंग रद्द केले. याच गोष्टीचा राग मनात धरून रिक्षाचालक मिथुन शेळके आणि त्याचे दोन साथीदार साहिल वारिंगे आणि पवन पुयाद यांनी सुमीतला डी. वाय. पाटील कॉलेजजवळ गाठले.
advertisement
मारहाण आणि खंडणीची मागणी: आरोपींनी सुमीतला जबरदस्तीने स्कूटी आणि रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेले. तिथे त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, 'बुकिंग रद्द केल्यामुळे आमचे नुकसान झाले आहे' असे म्हणत आरोपींनी सुमीतला सोडण्यासाठी तीन हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकारामुळे सुमीत प्रचंड घाबरला होता.
या घटनेनंतर सुमीतने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी मिथुन शेळके, साहिल वारिंगे आणि पवन पुयाद या तिघांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
