रुपेश मोरेचा पराभव
भाजप उमेदवार रंजना कुंडलिक टिळेकर यांनी प्रभाग क्रमांक 40 (ड) मधून विजय मिळवला आहे. रंजना टिळकर यांना 25859 मतं मिळाली. रंजना टिळकर आणि रुपेश मोरे यांच्यात तगडी फाईट पहायला मिळाली होती. मात्र, अखेरच्या काही मोजणीमध्ये रुपेश मोरे पिछाडीवर आल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे पहिल्याच निवडणुकीत रुपेश मोरे यांना पराभवाचं तोंड पहायला लागलं आहे. तर वसंत मोरे स्वत: पिछाडीवर असल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
मोरेंच्या राजकीय गडाला सुरुंग
कात्रज हा वसंत मोरेंचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र तेथील चारही जागा भाजपने जिंकल्याने वसंत मोरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय पेच मानला जात आहे.वसंत मोरे हे स्वतः प्रभाग ३८ (हडपसर-कोंढवा बुद्रुक) मधून शिवसेना (UBT) कडून रिंगणात आहेत. त्यांच्या प्रभागाची मतमोजणी सध्या सुरू असून, त्यांच्या मुलाच्या पराभवामुळे मोरेंच्या राजकीय गडाला सुरुंग लागल्याचे चित्र आहे.
रंजना टिळेकरांचा विजय
दरम्यान, रंजना टिळेकर यांच्या विजयाने भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची ताकद या भागात पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. मतदानाच्या आदल्या रात्री या प्रभागात चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला होता, मात्र मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.
