काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आम्हा सर्वांना विश्वास आहे. मी पुणेकरांना या विजयाचे श्रेय देईन की, त्यांनी विकासाला मत दिलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला. तसेच आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे रात्रंदिवस काम करत होते. आमच्याकडे जवळपास 2000 पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते, आम्ही 165 लोकांनाच संधी देऊ शकलो, असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
advertisement
पाहा Video
'कमळ' हाच आमचा उमेदवार
ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. काही लोक गेले, पण जे राहिले, त्यांनी, 'कमळ' हाच आमचा उमेदवार या विचाराने त्यांनी जे काही काम केले, मला त्यांचा अभिमान वाटतो आणि हा विजय मी त्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुणेकरांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला
दरम्यान, शेवटी लोक हे विकासाला मत देतात. पुणेकर विकासाला आणि प्रगतीला मत देतात. पुण्याचं भविष्य आणि आमची पुढची पिढी कुठे सुरक्षित राहू शकते, याचा विचार पुणेकर जनता करते. म्हणून मला निश्चितपणे हा विश्वास होता, म्हणून पहिल्या दिवसापासून सांगत होतो की भारतीय जनता पार्टी निश्चितपणे पुन्हा एकदा सत्तेत येईल, पुणेकरांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
