धंगेकरांना दुहेरी धक्का
धंगेकर कुटुंबासाठी हा निकाल दुहेरी धक्का देणारा ठरला आहे, कारण प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रभाग 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनी त्यांचा पराभव केला. एकाच वेळी घरातील दोन्ही प्रमुख उमेदवार पराभूत झाल्याने धंगेकर समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. पुण्याच्या राजकारणात 'जायंट किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धंगेकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मिळवलेला हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
advertisement
'महापौर साहेब' झाल्याचे बॅनर
म्हणतात पुण्याचं राजकारण ज्या कसब्यातून फिरतं, तिथं निकालापूर्वीच चुरस पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार गणेश बिडकर हे नगरसेवक म्हणून निवडून आल्याचे आणि थेट 'महापौर साहेब' झाल्याचे बॅनर शहरात लावण्यात आले होते. अशातच आता बिडकर पुण्याचे महापौर होणार का? असा सवाल विचारला जात आहे. मुरलीधर मोहोळ यांचे खास म्हणून गणेश बिडकर यांची ओळख आहे. त्यामुळे आता पुण्यातील चित्र क्लियर होताना दिसत आहे.
भुवया उंचावल्या
दरम्यान, पुण्यात गणेश बिडकर यांचे विजयाचे फलक झळकल्याने पुण्यात मात्र भुवया उंचावल्या आहेत. कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल केइएम हॉस्पिटल या प्रभाग क्रमांक 24 मधून गणेश बिडकर यांनी निवडणूक लढविली आहे. त्यांच्या विरोधात माजी आमदार आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांचे सुपुत्र प्रणव रिंगणात उतरले होते.
