धंगेकरांच्या पत्नीचा पराभव
अखेरच्या फेरीत प्रभाग 23 मधून रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर पिछाडीवर होत्या. तर सोनाली आंदेकर 1950 मतांनी आघाडीवर होत्या. पण अखेरीस सोनाली आंदेकरने दणक्यात विजय मिळवला अन् धंगेकरांच्या पत्नीचा पराभव केला आहे. 10809 मतं सोनाली आंदेकरला मिळाली तर प्रतिभा धंगेकरला 8859 मतं मिळाली. अतितटीच्या झालेल्या या लढतीत सोनाली आंदेकरने अखेर बाजी मारलीये.
advertisement
प्रभाग 23 मधील मतदारांचा कौल
दरम्यान, या दोन्ही महिला उमेदवारांनी आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला असून विकासकामांच्या मुद्द्यावरून एकमेकींना टक्कर देण्याची तयारी केली. पेठांमधील जुन्या वाड्यांचा प्रश्न, पाणीपुरवठा आणि स्थानिक नागरी सुविधा हे या निवडणुकीत प्रमुख मुद्दे ठरली होती. या प्रतिष्ठेच्या लढतीत प्रभाग 23 मधील मतदार नक्की कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरलं होतं.
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 4:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Andekar : काय म्हणता पुणेकर! हरले ना राव धंगेकर, वनराजच्या बायकोने केला करेक्ट कार्यक्रम! पुण्याच्या निवडणूक निकालात मोठा ट्विस्ट
