पुणे : राज्यात पोलीस भरती प्रक्रिया उद्या बुधवारपासून सुरू होत आहे. पुण्यात 1219 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी तब्बल 1 लाख 81 हजार 769 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. पुण्यातील पोलीस भरतीबाबत लोकल18 च्या टीमने विशेष आढावा घेतला.
पुण्यातील 'या' मैदानांवर पार पडणार भरती प्रक्रिया
advertisement
या मेगा भरतीसाठी पुणे पोलिसांनी देखील तयारी केली आहे. पुण्यात पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलीस दल, कारागृह विभागातील 1 हजार 219 पदांसाठी भरती प्रक्रिया उद्यापासून राबवली जाणार आहे. या जागांसाठी तब्बल 1 लाख 81 हजार 769 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पुण्यात भरतीसाठी मोठी स्पर्धा आहे. ही भरती प्रक्रिया पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, पाषाण रस्त्यावरील ग्रामीण पोलिसांचे चव्हाणनगर येथील मुख्यालयात आणि खडकीतील लष्कराच्या दारूगोळा कारखान्याच्या मैदानावर पार पडणार आहे.
यात उमेदवारांची शारीरिक मोजमाप पडताळणी आणि मैदानी चाचणी केली जाणार आहे. तीन ठिकाणी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. खुल्या गटासह एकंदर 11 प्रकारच्या जातीय व आर्थिक प्रवर्गांच्या माध्यमातून या भरती प्रक्रियेतून पोलिस भरती केली जाणार आहे.
पावसाळ्यात ठाणेकरांची या जागेला विशेष पसंती, अनेकांना पडली भूरळ, लोकेशन काय?
'ही' कागदपत्रे सोबत बाळगावी -
उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्याचे प्रवेशपत्र त्यांना तत्काळ दिले जाणार आहे. शैक्षणिक कागदपत्रे तपासणी होणार आहे. या प्रमाणपत्रांचे 2 झेरॉक्स संच, 6 पासपोर्ट साईज फोटो आणि जात प्रमाणपत्र या भरतीसाठी अनिवार्य आहे, असे सांगण्यात आले आहे. उमेदवारांना कळविण्यात आलेल्या आलेल्या भरती प्रक्रियेसाठी त्यांना कोणत्याही कारणास्तव उपस्थित राहता आले नाही, तर त्यांना दिनांक बदलून मिळणार नाही. तसेच, त्यांना दुसरी संधीही देण्यात येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मराठीत स्टँडअप poetry रुजवणारा अपूर्व बनला तरुणाईच्या गळ्यातील ताईत, कोण आहे हा तरुण?
तृतीयपंथी उमेदवारांचा देखील समावेश -
अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये 2 तृतीयपंथी उमेदवारांचाही समावेश आहे. लेखी परीक्षा आणि मैदानी शारीरिक चाचणी अशा दोन टप्प्यात ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उद्या 19 जून ते 10 जुलै 2024 दरम्यान याचे आयोजन करण्यात आले आहे. या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना काही अडचणी आल्यास त्याचे निरासन स्थानिक पातळीवर करण्याची सोयदेखील पोलीस प्रशासनाने केली आहे.





