पुणे : मुंढवा येथील तब्बल 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा तपास वेग घेत असून रोज नवे तपशील समोर येत आहेत. याप्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. शीतल तेजवानीला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुरावे गोळ करण्यासाठी पुणे पोलीसांनी तेजवानीच्या घरची झडती घेतली आहे. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानी हिच्या सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही घराची झाडझडती घेतली आहे. यावेळी शीतल तेजवानी हिच्या घराबाहेर वाढवला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
advertisement
शीतल तेजवानीच्या घराची पोलिसांकडून झडती घेतले जात आहे. शीतल तेजवानीला घेऊन पुणे पोलिसांचे पथक तिच्या घरी पोहलचसे. कोरेगाव पार्क येथील ऑक्सफर्ड हॉलमार्क या सोसायटीत शीतल तेजवानी हीचे घर आहे, यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला होता. शीतल तेजवानी तपासात सहकार्य करत नसण्याची माहिती मिळत आहे. काही वस्तू पोलिसांना जप्त करायचा आहे त्या अनुषंगाने शितल तेजवानी हिच्या घराची झडती पोलिसांकडून घेतली जात आहे .
पुणे पोलीस शीतल तेजवानीच्या माहेरी
शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी देखील पुणे पोलिसांना झाडझडती घेतली. पोलीस कोठडीत असलेल्या शीतल कडून महत्वाची कागदपत्रे हस्तगत करायची आहेत. मूळ कुलमुखत्यार पत्र, मूळ दस्त, तसेच 300 कोटींपैकी काही रक्कम हस्तगत करायची आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलीस पिंपरीच्या घरी आलेत. खरं तर शीतल आणि तिचे पती सागर सूर्यवंशी सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र तिचं माहेर हे पिंपरीतील वैष्णो देवी मंदिराजवळ आहे. शितलने याचं माहेरच्या घरात काही पुरावे दडवून ठेवले असतील, अशी शंका पुणे पोलिसांना आहे.
शीतल तेजवानीवर नऊ पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल
तेजवानीच्या विरोधात पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नऊ पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहे. यामध्ये, पिंपरी पोलिस ठाण्यात पाच, हिंजवडी, शिवाजीनगर आणि बावधन पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. याखेरीज, आर्थिक गुन्हे शाखेतही एक गुन्हा दाखल आहे. सर्व गुन्हे हे फसवणुकीसंदर्भात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. तेजवानी प्रकरणी गुरुवारी कोर्टात तीन तासाहून अधिक वेळ सुनावणी झाली. या सुनावणीत तेजवानीला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शीतल तेजवानीला या सुनावणीत खुर्ची बसायला मिळाल्याने व्हीआयपी ट्रीटमेंटची चर्चांना उधाण आले.
हे ही वाचा :
