'अजून काही पैसे घेतलेत का?' पुणे पोलिसांचा न्यायालयात आक्रमक युक्तिवाद, शीतल तेजवानी अडकली

Last Updated:

कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमिनीच्या विक्री प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.

शीतल तेजवानी-पार्थ पवार
शीतल तेजवानी-पार्थ पवार
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' कंपनीच्या कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमिनीच्या विक्री प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. आज तिला न्यायालयात हजर केले असता पुणे पोलिसांनी कोठडी मागितली. महत्त्वाचे १३ युक्तिवाद करून शीतल तेजवानीची पोलीस कोठडी का गरजेची आहे, हे पुणे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
सदर महिला आरोपी हिने शासनाचे मालकीची व ताब्यातील ४० एकर जमीन स्वतःचे फायदयाकरीता विक्री केलेली असून सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने त्याचा तपास करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. तसेच सदरची जमीन ही शासनाची असताना ती महार वतन दाखवून बेकायदेशिर रित्या जमीन हस्तगत करण्याकरीता तिची विक्री केलेली असून सदर सर्व गुन्हेगारी कटामध्ये आणखी कोण कोण सामिल आहे? याबाबत तिच्याकडे विचारपूस करून तपास करायचे असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
advertisement

शीतल तेजवानीच्या कोठडीसाठी पुणे पोलिसांकडून कोणकोणते युक्तिवाद?

१) सदर महिला आरोपी हिने मुळ वतनदार यांचेकडून घेतलेले मुळ पॉवर ऑफ अॅटॉर्नी, मुळ विकसन करारनामे व इतर वेगवेगळे दस्त तिच्याकडून हस्तगत करणे आहे.
२) २७२ मुळ वतनदार यांचे वारस यांना केलेले खरेदी विक्री दस्तामध्ये पैशाची देवाण घेवाण झालेली नसल्याचे दिसत असून त्याबाबत महिला आरोपी हिच्याकडे तपास करणे आहे.
advertisement
३) सदर प्रकरणी आरोपी महिला यांनी कोणा कोणासोबत पैशाचे व्यवहार केलेले आहे याची सखोल चौकशी करणे आहे.
४) सदर महिला आरोपी हिने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचे कार्यालयास दिनांक ३०.१२.२०२४ रोजी केलेले पत्रव्यवहाराचे मुळ कागदपत्र तिच्याकडून हस्तगत करणे आहे.
५) सदर महिला आरोपी हिने शासनाची जमीन ३०० कोटी रुपयांना विक्री केलेली असल्याने सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता तिने सदर गुन्हेगारी कृत्य करणे करीता डिजीटल डिव्हाईल, लॅपटॉप इ. वापरला असल्याची शक्यता असल्याने गुन्ह्याचे तपासकामी तिने वापरलेले डिजीटल डिव्हाईस, लॅपटॉप इ. तिच्याकडून जप्त करणे आहे.
advertisement
६) सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून सदर गुन्हा करताना तिच्या सोबत इतर आणखी लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत सहभागी असणारे इतर लोकांची नावे तिच्याकडून हस्तगत करून पुढील तपास करणे आहे.
७) सदर महिला आरोपी हिने केलेले खरेदी विक्री दस्तामध्ये जमिनीची रेडीरेकनर किंमत ३०० कोटी रुपये असल्याचे नमूद केलेले आहे. परंतु, वास्तविक रित्या सध्याचे बाजार भावानुसार सदर जमिनीची किंमत रेडीरेकनर दराचे ४ ते ५ पट जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिने आरोपीकडून रेडीरेकनर दराचे व्यतिरिक्त काही रक्कम घेतली आहे किंवा कसे? याबाबत तिच्याकडे सविस्तर तपास करून पुरावा गोळा करणे आहे.
advertisement
८) सदर महिला आरोपी हिने दिनांक ३०.१२.२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे एक पत्र व त्यासोबत ११,०००/- रुपयांचा डी डी जमा केला होता, सदर डी डी जमा करून तिने दिशाभूल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असून सदर डी डी हा तिने कोणाचे आदेशावरून जमा केला होता, सदर डी डी ची रक्कम ही ११०००/- रुपये इतकीच का भरली? सदर डी डी भरणे करीता तिने कोणा कडून माहिती घेतली, इतर कोणी तिचे सोबत सहभागी आहे किंवा कसे? याबाबत तिच्याकडे सखोल तपास करणे आहे.
advertisement
९) सदर महिला आरोपी हिने वर नमूद शासनाचे मालकीची जमीन ही ३०० कोटी रुपयांना खरेदी दस्तानुसार विक्री केलेली आहे. सदर ची रक्कम तिने घेतली आहे का? कोणत्या प्रकारे घेतली आहे? याबाबत तिस विचारपूस करून तपास करणे आहे.
१०) सदर महिला आरोपी हिने सन २०२० ते २०२१ दरम्यान सुध्दा कोणताही आदेश नसताना मा. जिल्हाधिकारी, पुणे यांचे कार्यालयास पत्रक देऊन सदर शेतजमीन परत मिळणे करीता सदर जमीनीचा कब्जा हक्क सारा रक्कम किती आहे? ती भरून घ्यावी, असे पत्रक दिलेले आहेत. शासनाचा कोणताही आदेश नसताना ती असे पत्रक देवू शकत नाही. तिने वारंवार असे पत्रक देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला असून सदर आरोपी महिलेस त्याबाबत विचारपूस करून तपास करणे आहे.
advertisement
११) सदर गुन्हा करण्याच्या कटामध्ये सदर महिला आरोपी हिचे सोबत कोण कोण सामिल आहे, याबाबत तिच्याकडे तपास करणे आहे. तरी वर नमूद मुद्दयांवर तसेच शासनाचे मालकीचे ४० एकर जमिनीची परस्पर विक्री करून शासनाची फसवणूक केली असल्याने गुन्हयाचे गांभीर्य पाहता सदर महिला आरोपीकडे सखोल तपास करणे असल्याने गुन्हयाचे तपासकामी तिची १४ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मिळण्यास विनंती आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अजून काही पैसे घेतलेत का?' पुणे पोलिसांचा न्यायालयात आक्रमक युक्तिवाद, शीतल तेजवानी अडकली
Next Article
advertisement
Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement