807 एकर जागावर प्रशासनाचा ताबा
भूसंपादनाच्या या प्रक्रियेत पहिल्याच दिवशी सुमारे 50 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे आता प्रशासनाने आता कामाचा वेग आणखी वाढवला आहे. जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे की, विमानतळासाठी आवश्यक असलेली एकूण 3000 एकर जमीन संपादित करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. येत्या शनिवारपासून आणखी दोन महत्त्वाची गावे, कुंभारवळ आणि खानावळ, येथे मोजणी सुरू करण्यात येणार आहे.
advertisement
स्वतंत्र पथकांची स्थापना
संमती दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यास प्राधान्य दिल्याने, पुरंदर विमानतळाच्या पुढील कामाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. यासाठी काही दिवसांपूर्वी जमिनीची मोजणी करण्यासाठी प्रारंभी जिल्हा प्रशासनाकडून पाच स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया वेगाने व्हावी, यासाठी आणखी एक पथक स्थापन करण्यात आले आहे.
95 टक्के जागा ताब्यात येणार?
महसूल खातं, वन खातं, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुरंदर उपसा सिंचन योजनेतील अधिकाऱ्यांचा या पथकामध्ये समावेश आहे. संमतिपत्रे देण्याच्या कालावधीत 3 हजार 220 शेतकऱ्यांनी 2 हजार 810 एकर जागेचे संपादन करण्यासंदर्भातील संमतिपत्रे सादर केली आहेत. त्यानुसार 95 टक्के जागा ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.