जादा परताव्याचे आमिष दाखवून आरोपींनी संबंधित ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन केला आणि वेळोवेळी गुंतवणुकीसाठी पैसे उकळले. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Pune Crime: हे तुमच्यासोबतही घडू शकतं! एक छोटी चूक अन् पुण्याच्या अशोक आजोबांनी गमावले 1 कोटी रूपये
advertisement
नेमकं प्रकरण काय ?
या फसवणुकीत बळी पडलेले व्यक्ती 88 वर्षांचे आहेत. ते मूळचे गुरुग्राम येथील असून, गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील मगरपट्टा परिसरात राहतात. हडपसर औद्योगिक भागात त्यांचा एक छोटा कारखाना होता. कोरोनाच्या काळात हा कारखाना विकण्यात आला होता. त्या विक्रीतून त्यांना मोठी रक्कम मिळाली होती.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर जास्त परतावा मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून त्यांनी सुरुवातीला काही रक्कम गुंतवली. नंतर चोरट्यांनी परतावा दिल्याचे दाखवले. मात्र प्रत्यक्षात त्यांना एकही रुपया मिळाला नाही.
यानंतर वेगवेगळ्या कारणांनी चोरट्यांनी त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये तब्बल 22 कोटी 3 लाख 22 हजार रुपये जमा करून घेतले. काही कालावधीनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
ज्येष्ठ नागरिकाने पैसे गुंतवत असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली नव्हती. फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. सध्या या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत. शेअर मार्केटच्या जादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या अशा भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.






