TRENDING:

Pune Crime : अभ्यासाच्या नावाखाली भेटीगाठी, बेधुंद झाले अन् संयम सुटला, 11 वीच्या मुलीसोबत घडलं भयंकर

Last Updated:

Pune Shocking News : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. जिथे एका मित्रानेच आपल्या मैत्रिणीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले.या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणी काळभोरमधून एक संतापजनक इतकाच धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गातील 17 वर्षीय मित्राने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलेले आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी तब्बल सात महिन्यांची गर्भवती राहिली आहे.
News18
News18
advertisement

पालकांची पोलिसांकडे धाव

घडलेल्या या घटनेनंतर लोणी काळभोरसह संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्या मुलाविरोद्धात गुन्हा नोंदविला गेला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलीसांनी तत्काळ अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नेमके प्रकरण तरी काय?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही एकाच नामांकित शैक्षणिक संकुलात शिकत होते तसेच शाळेत जाणे-येणे शिवाय एकत्र अभ्यास करणे या कारणामुळे त्यांच्यात जवळीक वाढत गेली. सुरुवातीला निरागस वाटणारे हे नाते कालांतराने चुकीच्या मार्गाने गेले.

advertisement

यावर्षीच्या जानेवारी 2025 मध्ये दोघे अभ्यासासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले असता आरोपीने तिला खोलीत नेऊन पहिल्यांदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.मग त्यानंतर धमकावून आणि तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आरोपीने पुन्हा पुन्हा असेच कृत्य केले. जानेवारी 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

मुलीच्या आरोग्यातील बदलामुळे गूढ प्रकरण समोर

advertisement

गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या तब्येतीत बदल तिच्या पालकांना दिसू आला होता त्यामुळे त्यांना शंका आली. वैद्यकीय तपासणीनंतर ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आणि धक्कादायक सत्य पालकांसमोर आले. यानंतर पीडितेच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.

आरोपीविरोद्धात कठोर कारवाई सुरु

पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई सुरू केली असून तो अल्पवयीन असल्याने त्याच्यावर बाल न्याय कायद्याअंतर्गत प्रक्रिया राबवली जात आहे. ऐवढेच नाही तर पीडितेचे जबाब नोंदवण्यात आले आहेत तसेच वैद्यकीय तपासणी अहवालही पोलिसांकडे जमा करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : अभ्यासाच्या नावाखाली भेटीगाठी, बेधुंद झाले अन् संयम सुटला, 11 वीच्या मुलीसोबत घडलं भयंकर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल