पुणे आणि बारामतीमध्ये व्यवहार बंद
महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहतील. आशिया खंडातील महत्त्वाची बाजारपेठ असलेले पुणे मार्केट यार्ड देखील दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी असोसिएशनने दिली आहे. दादांचे होमग्राऊंड असलेल्या बारामतीमध्येही व्यापाऱ्यांनी स्वतःहून कडकडीत बंद पाळला असून, संपूर्ण तालुक्यात शुकशुकाट पसरला आहे.
advertisement
अपघाताचे प्राथमिक कारण आणि परिस्थिती
आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा करुण अंत झाला. या घटनेनंतर बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर समर्थकांची आणि सामान्य नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.
प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणून दादांनी शहराच्या विकासात दिलेले योगदान लक्षात घेता, पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
