नेमका काय घडला थरार?
स्वारगेटमधील लक्ष्मीनारायण चौकातील 'मोदी प्लाझा' इमारतीत 'एलडिनेरो' हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस पथक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. मात्र, हॉटेलचे शटर घट्ट बंद होते. पोलिसांनी वारंवार आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.
advertisement
शटर तुटलं अन् गुपित उघडलं!
अग्निशमन दलाच्या जवानांनी शटरचे कुलूप तोडताच पोलिसांनी आत धाड टाकली. बाहेरून बंद वाटणाऱ्या या हॉटेलमध्ये आत मात्र ग्राहकांची मोठी गर्दी होती. कामगार ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन त्यांना तंबाखूजन्य हुक्का पुरवत होते. बाहेरून शांत दिसणाऱ्या या हॉटेलमध्ये आत हुक्क्याचा धूर आणि बेकायदेशीर व्यवहार जोमात सुरू असल्याचे पाहून पोलीसही अवाक झाले.
मालकासह ७ जणांवर गुन्हा
या कारवाईत पोलिसांनी हॉटेल मालक प्रतीक मेहता, व्यवस्थापक सनी परिहार याच्यासह पाच वेटरवर गुन्हा दाखल केला आहे. मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, मालकाच्या सांगण्यावरूनच हे हुक्का पार्लर गुपचूप चालवले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २२ हजार ५६० रुपयांचे हुक्का साहित्य आणि मुद्देमाल जप्त केला आहे.
