पुणे : मनात काही करण्याची जिद्द असेल तर वय फक्त आकडा असतो, असं म्हटलं जातं. याचं उत्तम उदाहरण पुण्यातील गंगाधामच्या स्वाती कुराणी या आहेत. जगातील सर्वोच्च शिखर मानल्या जाणाऱ्या माउंट एव्हरेस्टवर त्यांनी चढाई केलीये. नेपाळमधील लुक्ला ते एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा ट्रेक सर्वात कठीण मानला जातो. हा ट्रेक स्वाती यांनी वयाच्या 54 व्या वर्षी पूर्ण केलाय. त्यांनी आपल्या कृतीतून अनेक गिर्यारोहकांपुढे एक आदर्श निर्माण केलाय.
advertisement
एव्हरेस्ट मोहीम हे अनेक गिर्यारोहकांचं स्वप्न असतं. माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (5364 मीटर - 17600 फूट) हे जगातील सर्वात प्रसिद्ध शिखरांपैकी एक आहे. स्वाती यांनी वयाच्या 54 व्या वर्षी मोठ्या जिद्दीने ही मोहीम पूर्ण केलीये. कठीण परिस्थिती आणि खडतर प्रवास हा आपल्या मैत्रिणींच्या सह्याने पूर्ण केला. गेल्या 10 वर्षांत हिमाचलमधील अनेक ट्रेक पूर्ण केले आहेत. यात अन्नपूर्णा बेस कॅम्प, भृगु तलाव, चंद्रदाल यांचा समावेश आहे.
महिला पोलिसांची तत्परता; रस्त्यावरच केली गोंडस बाळाची सुरक्षित प्रसूती, लोकांकडून होतंय कौतुक
एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक हा तसा अवघड होता. कारण वय 54 असल्यानं मोठं आव्हान होतं. या आधी काही उंच ट्रेक केल्यामुळे मनात एक विश्वास होता. तरीही ट्रेक पूर्ण करताना एका उंचीवर ऑक्सीजन लेव्हल कमी जाणवत होती. त्यामुळे त्रास होऊ लागला. मात्र, आत्मविश्वासाने ट्रेक पूर्ण केला. जवळपास यासाठी 15 दिवस लागले. तर माझा हा 16 वा ट्रेक होता. त्यामुळे वय कोणतंही असलं तरी सर्वांनी आपला छंद जोपासायला हवा, असंही स्वाती कुणारी सांगतात.
दरम्यान, वयाच्या 42 व्या वर्षांपासून मला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. धाडसी स्वभाव असल्यामुळे मैत्रिणींची साथ मिळाली आणि पहिलं हिमालयीन ट्रेक केल गौमुक्त, नंतर अन्नपूर्णा बेस कॅम्प असे ट्रेक करत सह्याद्री ट्रेक देखील पूर्ण केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील 30 हून अधिक किल्ल्यांच्या मोहिमा देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं स्वाती सांगतात.





