नेमकी घटना काय?
ही घटना गेल्या रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील संभाजीनगर परिसरात घडली. फिर्यादी ऋषिकेश सुरेश भोसले (वय २९) आणि त्याचा मित्र निखिल उबाळे हे दोघे निखिलच्या घरासमोर थांबले होते. याच वेळी ऋषिकेश याचा चुलत भाऊ संभाजी बाळासाहेब भोसले तिथे आला. आपल्या एका नातेवाईक तरुणीसोबत ऋषिकेशचे प्रेमसंबंध असल्याचा संशय संभाजीला होता.
advertisement
याच संशयावरून संभाजीने ऋषिकेश याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर संभाजीने लाकडी दांडके काढून ऋषिकेश आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. रक्ताच्या नात्यातील भावानेच केवळ संशयावरून अशा प्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ऋषिकेश भोसले यानी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी संभाजी भोसले याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून आणि संशयावरून घडलेल्या या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
