लष्कर भागातील वाहतूक बदल
वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद ठेवण्यात येणार असून ती कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौक मार्गे वळवली जाणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक आणि व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. या परिसरातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात येईल. तसेच इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांना लष्कर पोलीस ठाण्याच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूकही बंद राहणार आहे.
advertisement
फर्ग्युसन रस्ता व जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल
कोथरूड व कर्वे रस्त्याकडून शहरात येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौकात थांबवली जाणार आहे. येथून वाहनांना विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता आणि अलका चौक मार्गे पाठवण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावर होणाऱ्या गर्दीमुळे झाशीची राणी चौकातून पुढील वाहतूक थांबवली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी व जंगली महाराज रस्त्यावर वाहतूक बंद
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर 31 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजल्यानंतर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. 15 ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौक या दरम्यान रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच फर्ग्युसन रस्त्यावर गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे. ही वाहतूकबंदी पहाटे पाच वाजेपर्यंत लागू राहणार आहे.






