पुणे : पुण्याची वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघाताचं प्रमाण हे सध्या वाढताना पाहिला मिळत आहे. यामुळे दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यूंचा आकडा हा वाढतच चालला आहे. पण रस्ते वाहतुकीबद्दल बऱ्याच लोकांना नियम माहिती नसतात. त्यामुळे प्रत्येकाला वाहतुकीचे नियम हे माहित असणे गरजेचं आहे. यासाठी पुणे वाहतूक विभाग हे वेगवेगळे उपक्रम राबवत शाळा कॉलेजमधील मुलांना वाहतूक नियम बदल जनजागृती मोहीम राबवत आहे. या विषयीची अधिक माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
advertisement
अमोल झेंडे सांगतात की, जनजागृतीसाठी शाळा कॉलेज असतील या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या आहेत. 100 पेक्षा जास्त शाळा कॉलेजमध्ये भेटी दिल्या आहेत. जनजागृती कार्यक्रम हे घेतले जातायत तर जवळपास 5 ते 6 हजार मुलानंपर्यंत जात त्यांना वाहतुकीचे जे काही नियम आहेत त्याबद्दल माहिती ही दिली आहे.
दररोज होणारी जी कारवाई आहे. त्यामध्ये आता मागील 1 तारखेपासून चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, ड्रॅंक अँड ड्राइव्ह आणि ट्रिपल सीट ड्राइव्हमध्ये 26 हजार केस या नोंद झाली आहे. या सोबतच मिशन 32 या रस्ते सुधार कार्यक्रम जो आहे तो देखील आम्ही ट्रॅफिक ब्रँच आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्ताने हाती घेतला आहे. यामध्ये 15 रोडची निवड करून त्या रोडवर सेफ्टीचे जे काही अँगेल वाहतुकीचे नियमन होण्याचे अडथळे असतील ते शिफ्ट करणे हे कार्यक्रम सध्या राबवला जात आहे, असं अमोल झेंडे सांगतात.
जर चालक अल्पवयीन असेल तर त्याला लायसन्स शिवाय परवानगी नाही चालवायची. परंतु असे जर काही झाले तर यामध्ये त्यांच्यावर कारवाई करून वाहन जपत करून त्यांच्या पालकांवर देखील कारवाई केली जाते. मागील वर्षी 3.5 लाख रुपयेचा दंड हा वसूल करण्यात आला आहे. गाडीला सायलेन्सर नसेल तर 500-1000 रुपयांचा दंड होऊ शकतो. तुम्ही अतिवेगाने वाहन चालवत असाल तर 1000 रुपये दंड भरावा लागेल. धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास 2000 रुपये दंड भरावा लागतो. असे काही वाहतुकीचे नियम तोडल्या नंतर तुम्हाला दंड हे भरावे लागतात, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.
#NationalHighwaysAuthorityofIndia #NHAI #MinistryOfRoadTransportAndHighways #MORTH
#NitinGadkari