सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद
सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. लिफ्टमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर आले. ही घटना संध्याकाळच्या सुमारास घडली असून, लिफ्टमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये अचानक लिफ्ट कोसळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लिफ्ट कोसळण्याची संपूर्ण घटना इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये लिफ्टचा वेग अचानक वाढल्याचे आणि ती थेट खाली आल्याचे स्पष्ट दिसत आहे. लिफ्ट खाली आदळल्यानंतरही आतील प्रवासी सुरक्षित राहिले, हा एक प्रकारे चमत्कारच मानला जात आहे.
advertisement
लिफ्टची नियमित तपासणी करा
दरम्यान, या घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशांनी लिफ्टच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने इमारतीमधील लिफ्टची नियमित तपासणी करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत. लिफ्टमध्ये वापरण्यात येणारे सुटे भाग आणि त्याची देखभाल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे. या घटनेने लिफ्टच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.