नेमकं कारण काय?
पुणे महानगरपालिकेच्या चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी रावेत येथील नाल्यामध्ये फुटली आहे. या जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करणे कठीण झाले आहे.
advertisement
कोणत्या भागांवर होणार परिणाम?
बंडगार्डन पाणीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या खालील परिसरांमध्ये पाणी कमी दाबाने आणि अनियमित येईल:
विश्रांतवाडी परिसर (अंशतः)
विमाननगर आणि विमानतळ सभोवतालचा परिसर
कळस माळवाडी, जाधववस्ती, म्हस्के वस्ती
संजय पार्क, वर्माशेल आणि गणेशनगर (बोपखेल)
पर्यायी व्यवस्था पण मर्यादा!
या भागांना सध्या पर्यायी जलवाहिनीद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. मात्र, मुख्य वाहिनी बंद असल्याने उपलब्ध पाण्याचा दाब कमी राहणार आहे. त्यामुळे किमान पुढील १० दिवस पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो.
