पुणे: एकीकडे धो धो पावसाने हैराण केलं असतानाच पुणेकरांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. पुणे महापालिका बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत स्थापत्य विषयक अत्यावश्यक आणि तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे येरवडा, टिंगरेनगर आदी भागातील पाणीपुरवठा गुरुवारी संपूर्ण दिवस बंद राहणार राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
पुण्यातील काही भागात 21 ऑगस्ट रोजी पाणी बंद राहणार आहे. बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील अत्यावश्यक आणि तातडीच्या दुरुस्तीची काम हेती घेण्यात आली आहेत. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील. तर शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या काळात पाणी साठवून ठेवावे आणि काटकसरीने वापरावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
MSRTC : एसटी ॲप सेवेची डेडलाइन हुकली; परिवहन विभागाची योजना का अयशस्वी ठरली?
पाणीपुरवठा बंद असणारे भाग
येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, येरवडा कारागृह वसाहत, प्रेस कॉलनी, कल्याणीनगर, धानोरी, कलवड, फुलेनगर, साप्रस, शांतीनगर, प्रतिकनगर, कस्तुरबा वसाहत.
