तापमानातील चढ-उतार
रविवारी (२१ डिसेंबर) पुण्यात ८.४ अंश सेल्सिअस इतक्या निचांकी किमान तापमानाची नोंद झाली होती. ज्यामुळे सकाळच्या वेळी शहरात चांगलाच गारठा होता. मात्र, कमाल तापमान २८ अंशांपर्यंत खाली आल्याने दिवसाही हवेत कोरडा गारवा जाणवत होता. आता हवामानात बदल होत असून, सोमवारपासून (२२ डिसेंबर) किमान तापमानात २ अंशांची वाढ होऊन ते १० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
advertisement
पुण्याचं झालं 'महाबळेश्वर'! 10 वर्षांतील थंडीचा रेकॉर्ड मोडला, 7 दिवसांपासून एक अंकी तापमान
पुढील आठवड्याचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारी आकाश मुख्यतः निरभ्र असेल, परंतु दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. सकाळी काही भागात विरळ धुके पडण्याची शक्यता असून कमाल तापमान २९ अंशांपर्यंत पोहोचेल. बुधवारपासून (२४ डिसेंबर) थंडीचा प्रभाव अधिकच कमी होईल. यावेळी किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असून, आकाश स्वच्छ राहील. थोडक्यात कडाक्याच्या थंडीची जागा आता अंशतः ढगाळ हवामान आणि वाढलेले तापमान घेणार आहे. त्यामुळे ख्रिसमसच्या काळात पुण्यात फारसा कडाका जाणवणार नाही, अशी चिन्हे आहेत.
पुण्यानं 10 वर्षाचा थंडीचा रेकॉर्ड मोडला
पुण्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला असून, एका दशकानंतर प्रथमच पुणेकरांना डिसेंबर महिन्यात सलग सात दिवस एकेरी अंकातील किमान तापमानाचा अनुभव येत आहे. शहरात 2015 नंतर पहिल्यांदाच अशी सलग आणि तीव्र थंडीची लाट नोंदवली गेली आहे. गेल्या सहा-सात दिवसांपासून किमान तापमान सातत्याने 7 ते 9 अंश सेल्सिअसदरम्यान राहिले असून, 20 डिसेंबर रोजी ते 6.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. हे तापमान या हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ठरले आहे.
