या प्रकरणी आरोपी महिलेविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही महिला वकील असल्याचं भासवत होती. फिर्यादी तरुणाच्या माहितीनुसार, याच वकिलीच्या बतावणीचा गैरफायदा घेत तिने त्याला सतत धमक्या दिल्या. गुंगीचे औषध देऊन तरुणावर अत्याचार केल्यानंतर तिने त्याचे काही अश्लील फोटो काढून ठेवले. या फोटोंच्याच आधारे ती तरुणाला वारंवार ब्लॅकमेल करुन त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती. एवढेच नव्हे, तर मागणी पूर्ण न झाल्यास खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत तिने तरुणाला वेठीस धरलं.
advertisement
या महिलेने तिच्या अत्याचाराचे जाळे केवळ पुण्याच्या तिच्या घरापुरते मर्यादित ठेवले नाही. मूळचा कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या या तरुणावर तिने पुण्यात अत्याचार केला. प्रकरण इतक्यावर थांबलं नाही तिने कोल्हापूरला त्याच्या घरी जाऊन तिथे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. वाराणसी इथेही तिने फिर्यादी तरुणाला बळजबरीने नेले आणि तिथेही तिच्या अत्याचाराला बळी पाडलं असं पीडित तरुणाने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितलं. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अश्लील फोटो काढून त्याला सतत मानसिक त्रास देत होती. त्याच्याकडे वारंवार पैसे मागत होती. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ती सतत पैशांसाठी दबाव टाकत होती. बदनामीच्या भीतीने आणि खोट्या केसमध्ये अडकण्याच्या धाकाने तरुण प्रचंड मानसिक तणावात होता. अखेर त्याने हिंमत करून कोथरूड पोलिसात या महिलेविरोधात धाव घेतली. पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. वकिलाची बतावणी करून गुंगीचे औषध पाजणे, जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करणे, अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणे आणि धमक्या देणे अशा अनेक गंभीर आरोपांचा यात समावेश आहे.
