अपघात झाला अन् आयुष्याला मिळाले वेगळे वळण, स्वप्नीलचा वन मॅन बँड, पर्यावरण जनजागृतीसाठी करतोय अनोखे काम
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
स्वप्नीलने संगीताचा वापर थेट समाजजागृतीसाठी करून एक वेगळीच दिशा दाखवली आहे. त्याच्या या उपक्रमामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील अनेक तरुणांमध्ये निसर्गप्रेम जागृत होत आहे.
पुणे : पुण्यातील स्वप्नील ठाकूर हा तरुण वन मॅन बँडच्या माध्यमातून जंगलसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचे अनोखे कार्य करत आहे. तरुणाई आज विविध क्षेत्रात आपली छाप उमटवत असताना, स्वप्नीलने संगीताचा वापर थेट समाजजागृतीसाठी करून एक वेगळीच दिशा दाखवली आहे. त्याच्या या उपक्रमामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील अनेक तरुणांमध्ये निसर्गप्रेम जागृत होत आहे.
मूळचे मध्य प्रदेशमधील असलेले स्वप्नील ठाकूर हे पुण्यात कॉर्पोरेटमध्ये नोकरी करत होते. मात्र, 2018 साली अपघात झाल्यानंतर स्वप्नील यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. ज्यानंतर त्यांनी कॉर्पोरेटमधील नोकरी सोडून संगीताला आपले करिअर बनवले. स्वप्नील ठाकूरने काही वर्षांपूर्वी वन मॅन बँडची स्थापना केली.
advertisement
पारंपरिक बँडच्या धर्तीवर काम करताना त्याने वन आणि सिंफनी या संकल्पनांची सांगड घालत एक वेगळा संदेश देण्याची तयारी केली. बँडचे सादरीकरण हे सामान्य सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता ते जंगल संवर्धनाशी जोडले आहे. संगीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांना पर्यावरणाबद्दल जागरूक करणे आणि प्रत्यक्ष कृतीसाठी प्रोत्साहित करणे हे या बँडचे मुख्य ध्येय आहे.
advertisement
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच आसपासच्या गावांत स्वप्नील आणि त्याचा वन मॅन बँड विविध उपक्रम राबवतात. शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती सत्रे, पर्यावरण दिन, वन महोत्सव, नदी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण कार्यक्रमात संगीताच्या माध्यमातून संदेश देणे, अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि प्लास्टिकविरहित मोहिमाही राबवण्यात आल्या आहेत.
स्वप्नील ठाकूर यांनी सांगितले की, संगीत ही असे माध्यम आहे जी थेट लोकांच्या मनाला भिडते. वनसंवर्धनासारख्या विषयाला जर भावनिक अंग देऊन मांडले तर लोक त्याचा गांभीर्याने विचार करतात. त्याच्या बँडने तयार केलेल्या काही विशेष गाणी, निसर्ग वाचवा, जंगल आपली शान, वन्यजीवांचे रक्षण करा यांसारख्या मोहिमा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत.
advertisement
स्वप्नील ठाकूरच्या या उपक्रमाला अनेक सामाजिक संस्थांचा पाठिंबा मिळत असून पर्यावरणप्रेमींच्या दृष्टीने वन मॅन बँड हा पुण्यातील प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे. तरुणाईने सकारात्मक बदल घडवण्याचा मार्ग शोधायचा झाला तर स्वप्नीलचे उदाहरण निश्चितच दिशादर्शक ठरू शकते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 26, 2025 4:47 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
अपघात झाला अन् आयुष्याला मिळाले वेगळे वळण, स्वप्नीलचा वन मॅन बँड, पर्यावरण जनजागृतीसाठी करतोय अनोखे काम

