वेळापत्रकातील प्रमुख बदल (26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर )
पुणे-मुंबई इंटरसिटी आणि पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्यांना 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे पोहोचण्यास 10 ते 15 मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता आहे.
लोकल सेवा विस्कळीत: या कालावधीत धावणाऱ्या पुणे-लोणावळा उपनगरीय (लोकल) गाड्या लोणावळ्यापर्यंत न जाता तळेगाव येथे शॉर्ट टर्मिनेट (Short Terminate) केल्या जातील.
advertisement
वासुदेवाची 'दान पावलं' आता हरवत चालली...; हजार वर्षापूर्वीचा वासुदेव आता दिसेनासा झाला
एक्स्प्रेस गाड्यांना उशीर : विविध कामांच्या ब्लॉक वेळेनुसार काही गाड्यांना विलंब होणार आहे.
पुणे-CSMT डेक्कन एक्स्प्रेस: 1 तास 15 मिनिटे उशीर.
कोल्हापूर-CSMT कोयना एक्स्प्रेस: 40 मिनिटे उशीर.
बंगळुरू-CSMT उद्यान एक्स्प्रेस: 30 मिनिटे उशीर.
दौंड-इंदूर एक्स्प्रेस: 1 तास उशीर.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मार्गावरील इतर एक्स्प्रेस:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडून धावणाऱ्या चेन्नई आणि हैदराबाद एक्स्प्रेसला लोणावळ्यात येण्यास 10 ते 15 मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता आहे.
ब्लॉकची वेळ
२८ आणि २९ नोव्हेंबर रोजी अप (मुंबईकडे जाणारा) आणि डाउन (पुण्याकडे येणारा) या दोन्ही मार्गांवर सकाळी ११.२५ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक असणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी या ११ दिवसांच्या कालावधीत रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीच्या वेळापत्रकाची सद्यस्थिती तपासून घ्यावी.
