काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
अतिशय सुसंस्कृत आणि सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितलं की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. मी या ट्विट सोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी जोडतोय. त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कशाकशा संदर्भात आहेत, असं म्हणत धंगेकरांनी पोस्टमध्ये काही डॉक्युमेंट जोडले आहेत.
advertisement
मोहोळांवर ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा - धंगेकर
अगदी ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. मला माहित आहे, राजकीय कार्यकर्ता म्हटल की गुन्हे असतात. काही हेतूपरस्पर केलेले असतात काही आंदोलनातले असतात. परंतु केवळ बदनामी करण्यासाठी माझ्यावर 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं मोहोळ म्हणाले, असं म्हणत धंगेकरांनी मोहोळ यांची पोलखोल केली.
जमीन चोरांचा पार्ट-2 लवकरच
ज्यावेळेस आपण बोलतो, त्यावेळेस आपण त्या प्रेसची सुद्धा फसवणूक करत असतो आणि तमाम पुणेकरांची देखील फसवणूकच करत असतो, हे एका केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदाराला अशोभनीय आहे. बाकी थेट जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणे घेऊन लवकरच भेटूयात, असं म्हणत धंगेकरांनी दंड थोपटले आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ अडचणीत
दरम्यान, पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंगचा तीन एकराचा भूखंड गोखले लॅंडमार्क एलएलपी या कंपनीने 230 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची भागीदारी असल्याचा आरोप झाला. पण मोहोळ यांनी मी मंत्री झाल्यानंतर या कंपनीच्या भागीदारीतून बाहेर पडलो असून, या व्यवहाराचा माझा काही संबंध नाही असा खुलासा केला आहे. त्यानंतर आता मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते, असा आरोप देखील धंगेकरांनी केला होता.
