शाळांना विशेष परिपत्रक जारी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. जुन्नर बिबट प्रवण क्षेत्रातील (शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड) गटशिक्षणाधिकारी यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याबाबत आणि शाळांना तातडीने सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे पायपीट करत शाळेत जातात. त्यांच्या मार्गावर अनेक ठिकाणी ऊस क्षेत्र, जंगल क्षेत्र, डोंगराळ भाग आणि बिबट प्रवण आपत्ती क्षेत्र आहेत. सध्या सुरू असलेल्या ऊसतोडीमुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला असून हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
advertisement
पुणेकरांनो सावधान! औंध पाठोपाठ आता धानोरीत पहाटेच दिसला बिबट्या; नागरिकांची झोपच उडाली
त्यातच हिवाळ्यामुळे संध्याकाळी लवकर अंधार पडतो. या अंधारात विद्यार्थी घरी परतणं अत्यंत धोक्याचं आहे. कोणताही विद्यार्थी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होऊ नये आणि विद्यार्थी रस्त्यावर रहदारी असताना तसेच अंधार पडण्यापूर्वी सुरक्षित घरी पोहोचावेत, हा या बदलामागील मुख्य उद्देश आहे.
या बिबट प्रवण आपत्ती क्षेत्रातील शाळांनी त्यांच्या शाळा व्यवस्थापन समिती (SMC) आणि शाळा समितीची मंजुरी घेऊनच वेळेतील बदल (सकाळी ९:३० ते दु. ४:००) तातडीने लागू करावा, असे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत.
