गोळीबारापूर्वी नेमकं काय घडलं होतं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केला. शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना पोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता. पैशांच्या देवाणघेवाणीतून दोघांमध्ये वाद देखील उडाला होता. घटना घडली त्यावेळी सकाळपासूनच हल्लेखोर हे शरद मोहोळ याच्यासोबत होते. संधी मिळताच त्यांनी मोहळ याच्यावर गोळीबार केला. मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरुडच्या सुतारदरा भागात गोळ्याचे चार राउंड फायर करण्यात आले. या घटनेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement
आठ आरोपींना अटक
दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 9 पथकं पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली. यादरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी-शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयीत स्विफ्ट गाडीचा पाठलाग करण्यात आला. यानंतर पोलिसांनी 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राऊंड आणि दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या.