अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण पवार कुटुंब कोलमडून पडले आहे. शरद पवार यांचा खंदा आधार हरपला आहे. अजित पवरांच्या निधनानंतर बारामतीत पुन्हा सक्रिय झाले आहे
advertisement
बारामतीतील निरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी शरद पवारांनी केली. मात्र अजितदादांच्या निधनानंतर ही पाहणी केवळ सांकेतिक आहे.
अजित पवार ज्यावेळी बारामतीत कारभार पाहत होते त्यावेळी बारामतीच्या कोणत्याही समस्येसंदर्भात शरद पवारांनी कधीच लक्ष घालत नव्हते. कारण शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी अजित पवारांकडे कारभार सोपावला होता
एवढचं नाही तर राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर देखील शरद पवारांनी कधीच बारामतीत लक्ष घातले नव्हते.
मात्र अजित पवारांचे निधन झाल्यानंतर आज त्यांचे अस्थीविसर्जन झाले असताना शरद पवारांनी नीरा वाघज या गावात जात नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली.
शरद पवारांना हे दाखवून द्यायचे आहे की मी बारामतीचे नेतृत्व करायला अजूनही सिद्ध केलं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेत्यांनी सुनेत्रा पवारांनी बारामतीचं नेतृत्व करावं अशी चर्चा सुरू असताना शरद पवारांनी एक मोठा संदेश दिला आहे.
