TRENDING:

Pune Crime : वडिलांनी औषध मागितलं तर किचनमधून चाकू आणला, जन्मदात्यावरच सपासप वार, बापाच्या मर्डरने पुणे हादरलं

Last Updated:

Pune Crime : पुण्याच्या कोथरूडमध्ये एका मुलाने आपल्या वडिलांची दसऱ्याच्या दिवशीच हत्या केली आहे. कोथरूडच्या जय भवानी नगरमध्ये गुरूवारी दुपारी पायगुडे यांच्या घरामध्ये ही घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्याच्या कोथरूडमध्ये एका मुलाने आपल्या वडिलांची दसऱ्याच्या दिवशीच हत्या केली आहे. कोथरूडच्या जय भवानी नगरमध्ये गुरूवारी दुपारी पायगुडे यांच्या घरामध्ये ही घटना घडली आहे. आरोपी सचिन तानाजी पायगुडे (वय 33) याचे त्याचे वडील तानाजी पायगुडे यांच्यासोबत जोरदार भांडण झाले, या भांडणातूनच सचिनने वडिलांची हत्या केल्याचा आरोप आहे. दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
वडिलांनी औषध मागितलं तर किचनमधून चाकू आणला, जन्मदात्यावरच सपासप वार, मर्डरने पुणे हादरलं (AI Image)
वडिलांनी औषध मागितलं तर किचनमधून चाकू आणला, जन्मदात्यावरच सपासप वार, मर्डरने पुणे हादरलं (AI Image)
advertisement

सचिन पायगुडे हा घरामध्ये टीव्ही पाहत होता, तेव्हा वडिलांनी सचिनला टीव्ही बंद करून डोळ्यात आयड्रॉप्स टाकायला सांगितलं, पण या क्षुल्लक कारणावरून बाप आणि मुलामध्ये वाद सुरू झाला आणि या वादाने हिंसक वळण घेतले.

बापावरच चाकूने सपासप वार

रागाच्या भरात सचिन पायगुडे स्वयंपाकघरात धावत गेला आणि चाकू घेऊन आला. यानंतर त्याने तानाजी पायगुडे यांच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर चाकूने वारंवार वार केले. या हल्ल्यात तानाजी पायगुडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घरामध्येच मृत्यू झाला. या घटनेमुळे पायगुडे यांचे शेजारी आणि जय भवानी नगरमध्ये भीतीचं वातावरण आहे.

advertisement

हत्येच्या घटनेनंतर कोथरूड पोलिसांना तातडीने कळवण्यात आले, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सचिन पायगुडेला अटक केली आहे. तानाजी पायगुडे यांची पत्नी सुमन पायगुडे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सचिन पायगुडेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात इथं मिळते प्रसिद्ध लेमन टी, चव अशी की एकदा प्याल तर पुन्हा याल
सर्व पहा

पुण्याच्या कोथरूडमध्ये घडलेल्या या धक्कादायक कृत्यामागील संपूर्ण तपशील आणि मूळ कारणं उघड करण्यासाठी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे, पण दसऱ्याच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे जय भवानी नगर परिसर हादरला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : वडिलांनी औषध मागितलं तर किचनमधून चाकू आणला, जन्मदात्यावरच सपासप वार, बापाच्या मर्डरने पुणे हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल