महामेट्रोकडून नियुक्त केलेले सुरक्षा पर्यवेक्षक आणि त्यांच्यासोबत असलेले सुरक्षा रक्षक मिळून गस्त घालणार आहेत. या गस्तीमुळे मेट्रोमधील शिस्तभंग, गैरवर्तनचे प्रकार रोखण्यात मदत होणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षितेसाठी महामेट्रोकडून दोन्ही मार्गिकांवर सुरक्षा गस्त
महामेट्रोकडून नियुक्त सुरक्षारक्षक आणि पर्यवेक्षक हे दोन्ही मार्गिकांवरील स्थानकांवर आणि मेट्रोमध्ये दिवसातून 5 ते 6 वेळा गस्त घालणार आहेत. यामध्ये मुख्यत्वे सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरवर्तन, स्थानक परिसरात आणि गाड्यांमध्ये कचरा टाकणे, मेट्रोमध्ये खाद्यपदार्थ खाणे तसेच मेट्रो कायद्याचे उल्लंघन करणारे प्रकार रोखण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रस्त घालणारे सर्व कर्मचारी हे अधिकृत गणवेशातच असणार आहेत. तसेच, त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात पूर्णपणे सतर्क राहतील या गस्तीदरम्यान कोणीही प्रवासी गैरवर्तन करताना आढळल्यास त्याला मेट्रो नियमांनुसार दंड करण्यात येणार आहे. पण, गैरवर्तन हे कायदा सुव्यवस्थेचा नियमाच्या आधीन असेल, तर त्या व्यक्तीला व्यक्तीला संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
advertisement
गर्दीच्या काळात स्थानक परिसरात कचरा टाकणे, मेट्रोमध्ये खाद्यपदार्थाचे सेवन आणि इतर गैरवर्तनाचे प्रकार वाढले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामेट्रोकडून दोन्ही मार्गिकांवर स्थानकांमध्ये आणि मेट्रो गाड्यांमध्ये विशेष गस्त राबवण्यात येणार आहे.गैरवर्तन करताना आढळल्यास संबंधित प्रवाशांना मेट्रो नियमांनुसार दंड केला जाईल, त्यामुळे प्रवाशांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितलं आहे.