Weather Alert: शक्ती चक्रीवादळाचा फटका! सोमवारी महाराष्ट्रात धो धो कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळामुळ महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. सोमवारी कोकण, मराठवाड्यास विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
1/7
ऑक्टोबरच्या सुरुवातीला राज्यातील पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र होते. परंतु, अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळच्या प्रभावामुळे राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मराठवाड्यासह विदर्भात याचा प्रभाव जाणवणार असून सोमवारी विदर्भातील 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने उघडीप दिली होती. परंतु, आता हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यतेसह ढगाळ हवामान पहायला मिळेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 आणि 24 अंश सेल्सिअस राहील. तर कोकणातील सर्व जिल्ह्यांत देखील हलक्या ते मध्यम पावासाचा अंदाज आहे. मंगळवारी ठाणे, पालघऱ परिसरात पावसाची तीव्रता पुन्हा वाढेल.

3/7
पश्चिम महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. सोलापूरसह सर्वच जिल्ह्यांतील तापमानात वाढ झाली आहे. पुढील 2 दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहणार असून त्यानंतर हवामानात मोठ्या बदलांचा अंदाज आहे. 8 ऑक्टोबरपासून पुन्हा पाऊस सक्रीय होण्याची शक्यता आहे.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत सोमवारी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी 24 तासानंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मंगळवारी धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.

5/7
मराठवाड्यातून पावसाने काढता पाय घेतल्याचे चित्र होते. परंतु, रविवारी धाराशिवमधील काही तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. आज छत्रपती संभाजीनगरसह कोणत्याही जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा नसला तरी आठही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 7 सप्टेंबरसाठी छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

6/7
पूर्व विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. नागपूर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 5 जिल्ह्यांना सोमवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. 7 ऑक्टोबरपासून पुन्हा हवामानात मोठ्या बदलांची शक्यता असून विदर्भातील पावसाची तीव्रता कमी होईल.

7/7
एकंदरीत शक्ती चक्रीवादळ आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु, 9 आक्टोंबर नंतर राज्यात स्वच्छ वातावरण पहायला मिळेल. तसेच कमाल तापमानात वाढ होऊन ‘ऑक्टोबर हिट’चे चटके जाणवण्याची शक्यत आहे.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement