विशेष गाड्यांचं वेळापत्रक
नांदेड- हडपसर साप्ताहिक विशेष गाडी (क्र.07607) ही 18 आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेडहून सकाळी 08:30 वाजता सुटेल. तसेच त्याच दिवशी रात्री 09:40 वाजता ही गाडी हडपसरला पोहोचेल.
हडपसर-नांदेड साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 07608) ही त्याच दिवशी म्हणजेच 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी सुटेल. हडपसरहून रात्री 10:50 वाजता सुटून ती दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 वाजता नांदेडला पोहोचेल.
advertisement
थांबे कुठे?
साप्ताहिक विशेष गाड्यांना गाड्यांना पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि दौंड येथे थांबे असणार आहेत.
कशी असेल ट्रेन?
या साप्ताहिक विशेष ट्रेनमध्ये एकूण 22 कोच असतील. यामध्ये एक प्रथम श्रेणी वातानुकूलित कोच, दोन वातानुकूलित 2- टियर, सहा वातानुकूलित 3- टियर, एक वातानुकूलित हॉट बुफे कार, सहा स्लीपर क्लास कोच, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन ब्रेक व्हॅन यांचा समावेश असेल.
