TRENDING:

Pune Local: पुणे ते लोणावळा सुसाट, निर्णय झाला, निधीही आला, रेल्वेचा मास्टर प्लॅन काय?

Last Updated:

Pune News: तिसरी आणि चौथी मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होऊन प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे–लोणावळा या उपनगरीय रेल्वेमार्गावरील तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने गती दिली आहे. वाढती प्रवासी संख्या आणि लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या हिश्श्याचे 765 कोटी रुपये थेट उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे कामाला वेग येणार आहे.
पुणे ते लोणावळा लोकल सुसाट जाणार, निर्णय झाला, निधीही आला, रेल्वेचा मास्टर प्लॅन काय?
पुणे ते लोणावळा लोकल सुसाट जाणार, निर्णय झाला, निधीही आला, रेल्वेचा मास्टर प्लॅन काय?
advertisement

मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रकल्पास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 11 सप्टेंबर 2025 रोजी अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयानुसार निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून मुंबई रेल्वे विकास महामंडळ यांच्याकडे निधी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यासही सरकारने संमती दिली आहे.

advertisement

पुणेकरांना झटका! घरांच्या किमतीत होणार मोठी वाढ; या तारखेपासून रेडीरेकनर दर 10 टक्क्यांनी वाढणार?

पुणे-लोणावळा रेल्वेमार्गाची एकूण लांबी 63.87 किलोमीटर इतकी असून या मार्गावर 17 स्थानकांचा समावेश आहे. दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिक या मार्गावरून प्रवास करतात. सध्या या मार्गावर लोकल आणि एक्सप्रेस गाड्या एकाच मार्गिकेवरून धावत असल्याने वेळापत्रकात वारंवार विलंब होतो. नव्या मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग स्वतंत्र होतील, त्यामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि प्रवास अधिक सुरळीत होईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 5 हजार 100 कोटी रुपये इतका आहे. त्यातील 30 टक्के म्हणजेच 765 कोटी रुपये राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. उर्वरित निधी केंद्र शासन आणि रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध होणार आहे. तिसरी आणि चौथी मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होऊन प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार आहे. परिणामी, पुणे-लोणावळा मार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Local: पुणे ते लोणावळा सुसाट, निर्णय झाला, निधीही आला, रेल्वेचा मास्टर प्लॅन काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल