लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जासोबत अनामत रक्कम भरणे बंधनकारक आहे. ही अनामत रक्कम अर्जदाराच्या उत्पन्न गटानुसार वेगवेगळी ठरवलेली आहे. अर्जासोबत अनामत रक्कम भरण्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम 10,000 रुपये आहे. त्यासोबत अर्ज शुल्क रुपये 600आणि त्यावर 18% जीएसटी म्हणजे 108 रुपये जमा करावे लागतात, ज्यामुळे एकूण रक्कम 10,708 रुपये होते. अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम 20,000 रुपये आहे. यासोबत अर्ज शुल्क आणि जीएसटी (एकूण 708 रुपये) जमा केल्यास एकूण रक्कम 20,708 रुपये होते.
advertisement
मध्यम उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम 30,000 रुपये असून, अर्ज शुल्क आणि जीएसटीसह (708 रुपये) ही रक्कम एकत्र केली तर एकूण 30,708 रुपये भरावे लागतात. उच्च उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम 40,000 रुपये असून, अर्ज शुल्क आणि जीएसटीसह एकत्रित रक्कम 40,708 रुपये होते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जदाराने भरलेली अनामत रक्कम कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही. तसेच, जर अर्जदाराने क्रेडिट कार्डद्वारे अनामत रक्कम भरली आणि ती रक्कम म्हाडाच्या खात्यात पोहोचली नाही किंवा काही कारणास्तव परत झाली, तर अशा अर्जांचा अर्ज लॉटरीसाठी स्वीकारला जाणार नाही.
अर्ज भरण्यासाठी नागरिक म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट https://housing.mhada.gov.in
किंवा आपल्या मोबाईलमध्ये MHADA Lottery ॲप वापरून ऑनलाईन अर्ज नोंदवू शकतात. लॉटरीसाठी अर्ज कसा करावा, अर्ज भरण्याची पद्धत, घरांच्या किमती आणि इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी म्हाडा लॉटरी 2025 या अधिकृत पीडीएफ नोटिफिकेशनचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
या लॉटरीद्वारे पुणेकरांना किफायतशीर घर मिळण्याची संधी मिळत असून प्रत्येक गटासाठी अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क नक्की तपासून भरावे लागेल. त्यामुळे अर्जदारांनी नियम, अटी तसेच फी लक्षात ठेवून वेळेत अर्ज करणे अत्यावश्यक आहे.