TRENDING:

बैलगाडा शर्यतीचं मैदान गाजण्याआधीच रक्ताचा खेळ! बैल पळवण्यावरून वाद, तरुणाला धारदार शस्त्रानं कापलं

Last Updated:

सुमारे महिनाभरापूर्वी बैल पळवण्याच्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये जोरदार शिवीगाळ झाली होती. तेव्हापासून आरोपी सिद्धांतच्या मागावर होते

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: बैलगाडा शर्यतीतील किरकोळ वादाचे रुपांतर एका भीषण खुनी हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना सुसगाव परिसरात घडली आहे. शर्यतीचा बैल पळवण्याच्या कारणावरून महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांनी एका २० वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे सुसगाव आणि मुळशी परिसरात मोठी खळबळ उडाली असून बावधन पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
बैल पळवण्यावरून वाद (प्रतिकात्मक फोटो)
बैल पळवण्यावरून वाद (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

या घटनेबाबत सिद्धांत कैलास मानमोडे या तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी प्रणव काशीनाथ वाघमारे ऊर्फ चिव्हया, त्याचा साथीदार क्षीरसागर आणि एका अनोळखी व्यक्तीने मिळून हा कट रचला होता. सुमारे महिनाभरापूर्वी बैल पळवण्याच्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये जोरदार शिवीगाळ झाली होती. तेव्हापासून आरोपी सिद्धांतच्या मागावर होते आणि त्यांनी त्याला मोबाईलवर संपर्क साधून जिवे मारण्याची धमकीही दिली होती.

advertisement

माणुसकीला काळिमा! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिसले चिमुकले पाय; जवळ जाताच..., पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दरात चढ-उतार, केळी आणि तिळाला काय मिळाला शुक्रवारी भाव? Video
सर्व पहा

मंगळवारी दुपारी संधी मिळताच आरोपींनी धारदार शस्त्राने सिद्धांतवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सिद्धांत गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुसगावसारख्या शांत परिसरात भरदिवसा झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. बावधन पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (खून करणे) सह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला असून फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने तरुणांमधील वाढत्या वादावर आता पोलिसांकडून कडक नजर ठेवली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
बैलगाडा शर्यतीचं मैदान गाजण्याआधीच रक्ताचा खेळ! बैल पळवण्यावरून वाद, तरुणाला धारदार शस्त्रानं कापलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल