मिळालेल्या माहितीनुसार थारमधून प्रथम शहाजी चव्हाण (, पुनित सुधारक शेट्टी , साहील साधु बोटे , महादेव कोळी , ओंकार सुनील कोळी, शिवा अरुण माने हे सर्व सहा मित्र प्रवास करत होते. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली असावी. ताम्हिणी घाटात झालेल्या थारच्या अपघात अतिशय भीषण होता.
advertisement
नेमका अपघात झाला कसा?
रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटातील एका मुख्य वळणावर एक थार कार वेगात येवून 500 फूट खोल दरीत कोसळली. दरम्यान, या अपघाताबद्दल आता नवी माहिती समोर आली आहे. रात्री साडे बारा वाजता या कारमधील सर्व जण कोकणाच्या दिशेने पुण्याहून निघाले होते. मध्यरात्रीच हा अपघात झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय. सहाही तरुणांचे मृतदेह हाती लागले असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. ताम्हिणी घाटातील या अपघातग्रस्त स्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे.
लोखंडी पोलचे तुकडे झाले
अपघाताचे मूळ कारण आणि अपघात स्थळावरून हवेत गेलेली थार 500 फूट खोल दरीत किती वेगात कोसळली असावी, याचा तपास घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झालेत. कोसळलेल्या थार कारचा वेगात लोखंडी बेरिगेट्स इतक्या जोरात धडकली की तेथील लोखंडी पोल तुकडे होऊन पडलेत. त्यामुळे या कार किती सुसाट वेगात असेल, याचा तपास आता फॉरेन्सिक टीमकडून घेतला जातोय.
हे ही वाचा:
