पुणे : सोशल मीडियावर रिल्स माध्यम हे अधिक प्रभावी माध्यम होत आहे. कमी कालावधीमध्ये अनेक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आणि लोकप्रिय होण्यासाठी या रील्ससाठी अनेकजण जीवघेणे स्टंट करत व्हिडिओ हे बनवले जातात. नुकताच मागील काही दिवसापूर्वी सिहंगड परिसरात असाच जीवघेणा व्हिडिओ पाहिला मिळाला आणि तो व्हिडिओ सोशल मीडिया माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र, हे असे रिल्स बनवणं जीवावर बेतू शकते. तसेच असे जीवघेणे रिल्स बनवणाऱ्यांवर पोलीससुद्धा कठोर कारवाई करू शकतात. म्हणून या जीवघेणे रिल्स बनवणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होऊ शकते, याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा विशेष रिपोर्ट.
advertisement
काही दिवसांपूर्वी, एक मुलगी तिच्या मित्राचा हात धरून उंच इमारतीवरून लटकत असल्याचे दिसून आली होती. इमारतीची उंची आणि मुलीची कृती तुमच्या हृदयाला धक्का देईल, असा तो व्हिडिओ होता. पोलिसांनी त्याच्या कारवाई देखील केली आहे. त्यामुळेच रिल्स बनवताना व्हिडिओ बनवणाऱ्यांनी सावधान असण्याची गरज आहे.
पोलीस कारवाई होणार -
पोलीस अशा व्हिडिओंवर कडक कारवाई करून त्यांना नियमानुसार नोटीस दिली जाते. 308, 336, 43 नुसार कलम लावले जाते. एद्याच्या जीवितला धोका निर्माण केल्यामुळे या कलमाअंतर्गत भविष्यात त्यांना शिक्षा ही होते. ती केस न्यायालयात जाते व नोटीसमध्ये त्यांना सांगितलेलं असून जर वारंवार ती घटना घडणार असेल तर ते शिक्षेला पात्र ठरू शकतात. जर असे चांगले व्हिडिओ बनवले जात आहेत तर कायद्याची बंधने पाळून एखाद्याच्या जीवितला धोका निर्माण होणार नाही, असा दृष्टीने रिल्स तयार करावेत, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
सोशल मीडियावर टाकणारी प्रत्येक गोष्ट ही समाजापर्यंत पोहचत असते आणि त्याचे काही ना काही परिणाम हे होतात. ती एक आपली जबाबदारी की आपण काय टाकतो आहे, समाजाला आपण काय देतो आहे, या सर्वांच भान ठेऊन सोशल मीडियावर असे व्हिडिओ पोस्ट केले पाहिजेत, असे आवाहन पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी केले आहे.