TRENDING:

‎Navratri 2025: नवरात्रौत्सवासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

Last Updated:

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील राज्यांतूनही भक्त दर्शनासाठी कार्ला येथे येतात. विशेषतः नवरात्रात देवीचे जागरण, पूजाअर्चा आणि भंडारा यामुळे मंदिर परिसरात दिवसरात्र गर्दी उसळते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : एकविरा देवी हे पुणे जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय आणि जागृत देवस्थान मानले जाते. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे भाविकांची संख्या नेहमीपेक्षा दुपटीने वाढते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील राज्यांतूनही भक्त दर्शनासाठी कार्ला येथे येतात. विशेषतः नवरात्रात देवीचे जागरण, पूजाअर्चा आणि भंडारा यामुळे मंदिर परिसरात दिवसरात्र गर्दी उसळते.
वाहतूक 
वाहतूक 
advertisement

राज्यभरातून येणाऱ्या भाविकांमुळे परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत. मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 115 तसेच शासन गृह विभागाच्या 19 मे 1990 च्या अधिसूचनेनुसार हे आदेश देण्यात आले असून, 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत हे बदल लागू राहणार आहेत. या कालावधीत कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी पायथा मंदिर मार्गावर अवजड आणि मोठ्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश निषिद्ध राहील.

advertisement

‎Navratri 2025: कर्णपुऱ्यातील तुळजाभवानीच्या दर्शन वेळेत मोठा बदल, भाविकांसाठी विशेष निर्णय

27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत, सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत जुना मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई महामार्गावरील कुसगाव बुद्रुक टोलनाका लोणावळा ते वडगाव फाटा, वडगाव मावळ या दरम्यान अवजड वाहनांना नो एन्ट्री असेल.

या बंदोबस्तामुळे अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. जुना मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाणारी जड वाहने लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक टोलनाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाक्याद्वारे पुणे शहराकडे वळविण्यात येतील. तर मुंबईकडे जाणारी जड वाहने वडगाव येथील तळेगाव फाटा मार्गे उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेने मुंबईकडे वळविली जातील.

advertisement

भाविकांची सोय आणि सुरक्षितता यासाठी वाहतूक नियंत्रणाबरोबरच पोलिस आणि प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. लोणावळा परिसरात पोलीस पथके, स्वयंसेवक आणि वाहतूक नियामक कार्यरत राहणार आहेत. तसेच, भाविकांना पार्किंगची अडचण येऊ नये यासाठी मंदिर पायथ्याशी तसेच कार्ला फाट्याजवळ स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/
‎Navratri 2025: नवरात्रौत्सवासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल