TRENDING:

Pune PMPML Update : पुणेकरांनो खुशखबर! उद्यापासून डबलडेकर बसची सुरुवात; कसा असेल मार्ग?

Last Updated:

Pune Double-Decker Bus : पुणेकरांसाठी वाहतुकीच्या सोयीमध्ये मोठा बदल घडवणारी बातमी आली आहे. अत्याधुनिक डबलडेकर बस उद्यापासून पुण्यातील आयटी पार्क परिसरात धावणार आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहरातील वाहतूककोंडी ही मोठी समस्या बनली आहे. विशेषतहा आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवर. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नई येथील 'स्विच’' कंपनीकडून मागविण्यात आलेल्या डबल डेकर बसची चाचणी सोमवारपासून (१५ सप्टेंबर) सुरू होणार असून, पुढील आठवडाभर ही बस हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा या आयटी हब परिसरात धावणार आहे.
News18
News18
advertisement

बृहन्मुंबई इलेक्‍ट्रिक सप्‍लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट)च्या धर्तीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उपनगरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. पाच वर्षांपासून डबल डेकर बस सुरू करण्याबाबत चर्चा आणि प्रस्ताव सुरू होते. मात्र, अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. अखेर वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी या योजनेला गती मिळाली आहे.

advertisement

हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा हे आयटी क्षेत्र वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जातात. हजारो कर्मचारी दररोज या भागात प्रवास करतात. त्यात खासगी वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यांवर सतत गर्दी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात या आयटी हब परिसरात डबल डेकर बसची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चाचणीदरम्यान रस्त्यांची स्थिती, बसची क्षमता, प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, गर्दीच्या वेळी होणारा परिणाम यासंबंधी तपासणी होईल. यामध्ये मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे डबल डेकर बस कोणत्या प्रमुख रस्त्यांवर आणि कोणत्या वेळेत चालवाव्यात याचा अभ्यास केला जाणार आहे. कंपनीचे अधिकारी व पीएमपीचे शिष्टमंडळ प्रत्यक्ष पाहणीसाठी बससोबत प्रवास करणार आहेत.

advertisement

पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले की, ''सोमवारपासून पुढील आठवडाभर विविध रस्त्यांवरून या डबल डेकर बसची चाचणी होईल. अभ्यासातील निष्कर्ष लक्षात घेऊन पुढील मार्ग आखला जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.''

अशी असेल डबल डेकर बस

या आधुनिक डबल डेकर बसची किंमत सुमारे दोन कोटी रुपये असणार आहे. बसमध्ये प्रवाशांसाठी 70 आसनक्षमता उपलब्ध असेल. बसच्या डिझाईनमुळे अधिक प्रवासी एकाच वेळी आरामात प्रवास करू शकतील. त्यामुळे रस्त्यावर खासगी वाहनांची गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

advertisement

पुणेकरांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, यशस्वी झाल्यास शहरातील इतर भागातही डबल डेकर बस धावू लागतील. त्यामुळे वाहतूककोंडीवर मोठ्या प्रमाणात उपाय होऊन सार्वजनिक वाहतुकीची सोय अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune PMPML Update : पुणेकरांनो खुशखबर! उद्यापासून डबलडेकर बसची सुरुवात; कसा असेल मार्ग?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल