पुणे : राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. याच रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या निमित्ताने पुण्यात एक अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम साजरा करण्यात आला.
advertisement
पुण्यातील ज्या महिलांना भाऊ नाहीत, अशा महिलांनी सीमेवरील जवानांना तसेच काही तरुणांना राखी बांधत हा राखीपौर्णिमेचा सण साजरा केला आहे. पुण्यातील वैष्णवी फाऊंडेशन तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये शहरातील महिलांच्या हस्ते जवानांना आणि वृक्षांना राखी बांधून तसेच ज्या महिला भगिनींना भाऊ नाही किंवा कामानिमित्त परगावी आहे, अशा महिला भगिनींकडून युवकांनी राख्या बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे केले. अनेक महिलांनी यात सहभाग घेतला.
डोंगर रांगांच्या कुशीत अन् निसर्गाच्या सानिध्यातलं बेलेश्वर मंदिर, अनोखा आहे इतिहास, VIDEO
आयुष्यभर सैनिक रात्रंदिवस आपले संरक्षण करून देशाची सेवा करतात. वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखून ऊन, वारा, पावसात संरक्षण देते तसेच प्राणवायू देऊन जीवनदान देतात. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही दरवर्षी रक्षाबंधन साजरे करतो, असे आयोजकांनी म्हटले. तर हा कार्यक्रम साजरा करत असतानाच आनंद काही निराळाच आहे, असेही ते म्हणाले.
अंक शास्त्रामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी मिटू शकतात?, नेमका काय आहे हा प्रकार?, VIDEO
भारतीय सैनिक सलग बाराही महिने संरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून काम करत असतात. त्यामुळे त्यांना रक्षाबंधन या महत्त्वाच्या सणालाही आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधायला येणे शक्य होत नाही. अशा सैनिकी भावांचा या सणाच्या दिवशी उत्साह वाढावा, त्यांच्या हातून अखंडपणे चांगली देशसेवा घडावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविला असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.