डोंगर रांगांच्या कुशीत अन् निसर्गाच्या सानिध्यातलं बेलेश्वर मंदिर, अनोखा आहे इतिहास, VIDEO
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
बाहेरून एखाद्या किल्ल्यासारखी दिसणारी भव्य तटबंदी, मंदिराच्या तटबंदीचा मुख्य दरवाजा हा तितकाच दिमाखदार. असे हे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पखरुड येथे बेलेश्वराचे मंदिर आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : महाराष्ट्रात हजारो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची एक अनोखी कहाणी आहे. आज अशाच एका मंदिराची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात बालाघाट डोंगर रांगांच्या कुशीत असलेलं हे बेलेश्वराचं मंदिर.
बाहेरून एखाद्या किल्ल्यासारखी दिसणारी भव्य तटबंदी, मंदिराच्या तटबंदीचा मुख्य दरवाजा हा तितकाच दिमाखदार. असे हे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पखरुड येथे बेलेश्वराचे मंदिर आहे. मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान करण्यात आले. त्यामुळे या मंदिराला बेलेश्वर असे म्हटले जाते.
advertisement
अंक शास्त्रामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी मिटू शकतात?, नेमका काय आहे हा प्रकार?, VIDEO
खर्डा येथील संस्थांचे राजे सुलतानराव राजेनिंबाळकर एकदा काशीला गेले होते. त्यांनी तिथून महादेवाच्या 7 पिंडी आणल्या आणि त्यांनी त्या 7 लिंगांची प्रतिष्ठापना खर्ड्याच्या आजूबाजूला केली. त्यापैकी एक बेलेश्वर मंदिर आहे. गुरु तुकाराम महाराजांना त्यांनी हे देवालय अर्पण केले आणि देवस्थानचा देऊळवाडाही राजे सुलतानराव राजे निंबाळकर यांनी बांधून दिल्याचे सांगण्यात येते.
advertisement
या ठिकाणी एकमुखी दत्तात्रयांची मूर्ती पाहायला मिळते. ज्या गुहेत तुकाराम महाराज तपश्चर्या करायचे, ती गुहा या ठिकाणी पाहायला मिळते. तर या गुहेतून एक वाट खर्डाच्या किल्ल्यात निघते, असेही म्हटले जाते. मंदिरात एक चिंचेचे झाड असून त्याला दोन फाटे आहेत. त्यातील एका फाट्याचा पाला गोड लागतो. तर एका फाट्याचा पाला आंबट लागतो, त्यामुळे भक्त याला चमत्कार म्हणतात.
advertisement
विशेष म्हणजे या ठिकाणी 3 मंदिरे आहेत. तिन्ही मंदिरांचे बांधकाम हेमाडपंथी आहे, ज्याठिकाणी श्री बेलेश्वर, श्री दत्तात्रय आणि रेणुका माता यांच्या मूर्ती आहेत. या शिव मंदिरात भलीमोठी पिंड आहे. मंदिर प्राचीन असून गाभाराही तितकाच जुना आहे. आजही मंदिराबाहेर नंदी आहे. तसेच मंदिर सुस्थितीत आहे. मात्र, या बेलेश्वर मंदिराच्या बाहेरील परी कोटाच्या चिरेबंदीची पडझड झाली आहे.
advertisement
मंदिराच्या समोर आवारात एक लहान मंदिरात श्री तुकाराम तीर्थ स्वामी महाराजांची समाधी आहे. त्याचबरोबर त्यांच्यासमोर असलेल्या मंदिरात विठ्ठल-रुक्मिणींच्या मूर्ती आहेत तर मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहेत.
सूचना - या बातमीत दिलेली आख्यायिका ही मान्यतेवर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Aug 19, 2024 3:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
डोंगर रांगांच्या कुशीत अन् निसर्गाच्या सानिध्यातलं बेलेश्वर मंदिर, अनोखा आहे इतिहास, VIDEO






